US Hindu Mandir Desecration : अमेरिकेत पुन्हा एकदा हिंद मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियात चिनो हिल्स येथे असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात या मंदिराची विटंबना करण्यात आली. याविरोधात आता परराष्ट्र मंत्रालयानेही निषेध नोंदवला असून स्थानिक अधिकाऱ्यांना कठोर कारवाई आवाहन करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने कळवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (बीएपीएस) याबाबत सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी म्हटलंय की, चिनो हिल्समध्ये असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाली आहे.

तसंच, या घटनेनंतर BAPS पब्लिक अफेयर्स टीमनेही याविरोधात निषेध नोंदवला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “सीएच्या चिनो हिल्समध्ये झालेल्या आणखी एका मंदिराच्या अपवित्रतेच्या पार्श्वभूमीवर, हिंदू समुदाय द्वेषाविरुद्ध ठाम आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियामधील समुदायासोबत, आम्ही कधीही द्वेषाला थारा देणार नाही.”

परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल

मंदिर विटंबनेची दखल परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. त्यांनी म्हटलंय, “आम्ही अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि प्रार्थनास्थळांना पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो.

गेल्या वर्षी, कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथील BAPS हिंदू मंदिर आणि न्यू यॉर्कमधील मेलव्हिल येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची खूप विटंबना झाली होती.