एपी, तेल अवीव

सुमारे महिनाभर सुरू असलेल्या युद्धात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि गाझामध्ये आणखी मदतसामग्री येऊ देण्यासाठी ‘मानवीय युद्धविराम’ करण्याकरता अमेरिकेचा वाढत असलेला दबाव इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी  मान्य केलेला नाही. हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे २४० लोकांची सुटका केल्याशिवाय तात्पुरता युद्धविराम होणार नाही, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

 युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायलला तिसऱ्यांदा भेट दिली आणि हमासच्या ७ ऑक्टोबरच्या पाशवी हल्ल्यानंतर या दहशतवादी गटाला चिरडून टाकण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. मात्र, मानवीय संकट आणखी गडद होत असल्याच्या मुद्दय़ावर उपाय म्हणून युद्ध तात्पुरते थांबावे, हे अध्यक्ष जो बायडेन यांचे आवाहनही त्यांनी नेतान्याहू यांच्यापर्यंत पोहोचवले.

Story img Loader