मद्यसम्राट विजय मल्या हे भूमिपुत्र आहेत, ते देशातून पळून गेलेले नाहीत, असे मत माजी पंतप्रधान एच. डी. देवैगौडा यांनी व्यक्त केले आहे. अन्य बडय़ा व्यक्तींनीही अनेक बँकांचे पैसे थकविलेले असतानाही त्यांच्याकडून आतापर्यंत त्याची वसुली का करण्यात आली नाही, असा सवालही देवेगौडा यांनी केला आहे.
देशातील जवळपास ६० बडय़ा व्यक्तींनी पैसे थकविलेले आहेत. असे असताना माध्यमांमधून केवळ मल्या यांच्या संदर्भातीलच बातम्या का येत आहेत,
तथापि, मल्यांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घ्यावयाचा आहे. जद(एस)च्या मदतीने मल्या २००२ आणि २०१० मध्ये राज्यसभेचे खासदार झाले. मल्या देश सोडून पसार झाला आहे, असे म्हणणे उचित ठरेल का, असे विचारले असता माजी पंतप्रधान म्हणाले की, मल्या यांनी केलेल्या ट्वीटनुसार, समस्या सोडविण्यासाठी त्यांची सरकारच्या विविध यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेशी सहकार्य करण्याची इच्छा आहे. मल्या हे भूमिपुत्र आहेत, ते देश सोडून पसार झालेले नाहीत, असेही देवेगौडा म्हणाले.ह्ण