प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा हे भारतात आल्याने दिल्लीभोवती सुरक्षेची अभेद्य तटबंदी उभी करण्यात आली आहे. ओबामा यांच्या भारतभेटीला रविवारी सुरुवात झाली. ओबामा यांचे भव्य स्वागत झाल्यानंतर दोन्ही नेते व उभय देशांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली.
ओबामा यांच्या आगमनामुळे मध्य दिल्लीत सुरक्षेची बहुस्तरीय तटबंदी उभी करण्यात आली असून त्यात दिल्ली पोलिसांच्या ४० हजार जवानांचा समावेश आहे. निमलष्करी दलाचे जवान कानाकोपऱ्यात सुसज्ज आहेत. किमान १५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आले आहेत, त्यामुळे केंद्रीय नियंत्रण कक्षात सर्व हालचाली टिपल्या जात आहेत. दिल्ली पोलीस अमेरिकी गुप्तचर सेवा व केंद्रीय सुरक्षा दले अशी सुरक्षेची रचना आहे.
राजपथाजवळ तटबंदी
राजपथपासून तीन कि.मी.च्या पट्टय़ात संचलनामुळे सातस्तरीय सुरक्षा आहे तेथे १६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दर १८ मीटरवर एक कॅमेरा आहे. स्नायपर्स व स्पॉटर्स हे इमारतींवर प्रजासत्ताक दिन संचलनाच्या दिवशी पहारा देतील. आकाशात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्या टिपण्यासाठी रडार लावण्यात आले आहे व एखादे विमान बंदी क्षेत्रात आल्यास ते पाडण्यासाठी विमानभेदी बंदुका आपले काम करतील. दिल्लीवरून जाणारी सर्व विमाने वळवण्यात येत आहेत. आता उड्डाणबंदीची मर्यादा ३५ हजार फूट करण्यात आली आहे. राजपथपासून ४०० किमी त्रिज्येत एकही विमान उडणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा