कर्नाटकच्या चिक्कमंगलुरू येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाषणाची सुरूवात थेट कन्नड भाषेतून केली. त्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत फडणवीसांचं अभिनंदन केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गुजरात दंगल आणि नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट Youtube आणि ट्विटरवर ब्लॉक, केंद्राच्या आदेशानंतर कारवाई

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

”आज पर्यंत मी अनेक शहरांमध्ये गेलो. मात्र, चिक्कमंगलुरू इतकं स्वच्छ शहर मला कुठेही दिसलं नाही. जेव्हा मी या शहरात दाखल झालो, तेव्हा येथील स्वच्छता बघून भारावून गेलो. याचे पूर्ण श्रेय सीटी रवी यांचं नेतृत्व आणि महानगर पालिकेच्या कर्मचार्यांना जातं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केलेलं ‘स्टिंग ऑपरेशन’ बनावट? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या, “माझ्याबद्दल गलिच्छ…”

महाराष्ट्र-कर्नाटकचे खूप जुने संबंध

”महाराष्ट्र आणि कर्नाटकचे खूप जुने संबंध आहे. मराठी आणि कन्नड या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत. दोन्ही भाषेतील साहित्य नागरिकांना दिशा देणारं आहे. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, तेव्हा मी लगेच हे निमंत्रण स्वीकारलं. मी इथे आलो, त्याचं आणखी एक कारण म्हणजे, माझे बंधू सीटी रवी यांच्या प्रेमामुळे. ते जे काही करतात, ते मोठं असतं, त्यामुळे इथे येऊन मोठा महोत्सव मला बघायला मिळेल याची खात्री होती, म्हणून मी या कार्यक्रमाला आलो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पकडले

”या महोत्सवाचे संपूर्ण थीम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’वर आधारीत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जगातील सर्वात जुन्या संस्कृतीपैकी एक आहोत. अशा संस्कृतिला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यांचं काम या महोत्सवाद्वारे केलं जात आहे, त्यामुळे मला अशा महोत्सवात निमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मनतो”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis at chikkamagaluru cultural fest 2023 strart speech in kannad language spb