मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. त्यात भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणिशग फुंकले. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य भाषण झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांनाच प्रमुख्याने लक्ष्य केले. मुंबईला माफियांच्या व लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करायची आहे, असा शिवसेनेवर हल्ला चढवीत हनुमान चालिसा आणि बाबरी प्रकरणावरुन फडणवीसांनी भाष्य केलं. या वेळी बोलताना आपण स्वत: बाबरीचं पतन झालं तेव्हा तिथे असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. तसेच एक कारसेवक म्हणून आपण १८ दिवस तुरुंगामध्ये होतो असंही फडणवीस म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलंय. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.

बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली. राज्यात आता हनुमान चालिसा म्हटले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मग तुम्ही कुणाच्या बाजूचे आहात रामाच्या की रावणाच्या असा सवाल त्यांनी ठाकरे यांना उद्देशून केला.

…१४ मेनंतर पोलखोल सभा
आजची सभा ही पोलखोल सभा नाही. १४ मेनंतर मी तशी सभा घेणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी त्यानंतर सभा घेण्याची घोषणा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis slams shivsena says i was there when babri was demolished scsg