लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच एक मुलाखत दिली. ही मुलाखत घेतली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने. विशेष म्हणजे या मुलाखतीत राजकारणाविषयी एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. मोदींचं खासगी आयुष्य कसं आहे हे या मुलाखतीत जाणून घेण्याचा प्रयत्न अक्षयने केला. काहींनी या मुलाखतीची स्तुती केली तर काहींनी त्यावर टीकासुद्धा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयच्या विविध चित्रपटांचा फोटो आणि त्यातच पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत मुंडे यांनी लिहिलं, ‘सोचता था के वो कितने मासूम थे, क्या से क्या हो गए देखते देखते.’ बॉलिवूड गाण्याच्या माध्यमातून मुंडे यांनी टोमणा मारला. ‘अरे इंटरव्यू होता की कौतुक सोहळा? आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनिअर मनोज कुमार समजत होतो हा तर भक्त निघाला..’ अशा शब्दांत त्यांनी अक्षयला चिमटा काढला.

पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde criticised akshay kumar after interview of pm narendra modi