Dhanbad BCCL News: केंद्रीय कोळसा राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंत्री सतीश चंद्र दुबे रविवारी झारखंडच्या दौऱ्यावर होते. ‘बीसीसीएल’च्या कोळसा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी सतीश चंद्र दुबे धनबादमध्ये आले होते. या दौऱ्यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सोफ्यावर आरामशीर बसलेल्या केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांचे बूट एक अधिकारी काढत असल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाही तर मंत्र्याच्या पायजम्याची नाडीही बांधत असल्याचा दावा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे हे झारखंडच्या दौऱ्यावर असताना भारत कोकिंग कोल लिमिटेडचे (बीसीसीएल) एक अधिकारी केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांच्या झारखंडमधील भेटीदरम्यान त्यांचे बुट काढताना आणि पायजम्याची नाडी बांधत असल्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. विरोधकांनी राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, धनबादमधील बीसीसीएलच्या एका भूमिगत खाणींची पाहणीदरम्यान हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!

हेही वाचा : दिल्लीतील संशयित रुग्णाला लागण झाल्याचे स्पष्ट; ‘मंकीपॉक्स’बाबत केंद्राच्या सूचना

व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

बीसीसीएलच्या अधिकाऱ्याने केंद्रीय मंत्र्याचे बूट काढले, पायजम्याची नाडी बांधल्यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओनंतर मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, यानंतर भारत कोकिंग कोल लिमिटेडच्या (BCCL) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्टीकरण देत सोशल मीडियावर केले जाणारे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. तसेच सांगितलं की, “बीसीसीएलचे अधिकारी हेडलॅम्प बॅटरी वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेल्टच्या दुरुस्तीसाठी राज्यमंत्री दुबे यांना मदत करत होते. याबरोबरच खाणकामाशी संबंधित असलेल्या नियमानुसार, खाणीत प्रवेश केल्यानंतर खाणीतील बूट, हेल्मेट, हेडलॅम्प, बॅटरी, बेल्ट आणि काठी इत्यादी सर्व वस्तू मोजल्या जातात आणि स्टोअरमध्ये ठेवल्या जातात”, असं म्हटलं आहे.