छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्याचा आणि नथुराम गोडसेचे कौतुक केल्याचा आरोप या कार्यक्रमाबाबत करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपानुसार, या धर्म संसदेत मुख्य संरक्षक राम सुंदर महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. या कार्यक्रमात २० धर्मगुरू सहभागी झाले होते. ज्यामध्ये काहींनी भाषण देताना स्वतः सनातन हिंदूंना शस्त्रे दिल्याची चर्चा होती. त्याचवेळी त्यांच्यापैकी एकाने महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले.

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम सोडला..

त्यानंतर रविवारी संध्याकाळी गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या संत कालीचरण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही अचानक या कार्यक्रमातून निघून गेले.

धर्म संसदेत दिलेल्या भाषणात, धर्मगुरूंनी सनातन हिंदूंना शस्त्रे घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तयार होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील एक धर्मगुरू संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले आहे. त्यांनी अल्पसंख्याकांवर वेगवेगळ्या देशांचे राजकारण आणि प्रशासन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

दुसरीकडे, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत असहमती व्यक्त करत स्वामी स्वरूपानंद या कार्यक्रमात म्हणाले की, जिथे ३० कोटी मुस्लिम आणि सुमारे १५ कोटी ख्रिश्चन राहतात, त्या देशाला तुम्ही हिंदू राष्ट्र काय म्हणाल?

तक्रार दाखल..

कालीचरण महाराज यांच्या विधानानंतर संसदेचे निमंत्रक दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनी विरोध करत स्वतःला या धर्मसंसदेपासून दूर केलं. या धर्मसंसदेचा उद्देश फळाला न आल्याचंही ते म्हणाले. दरम्यान नंतर कालीचरण यांच्या विरोधात रविवारी रात्री उशिरा आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

एनजीओ नीलकंठ सेवा समिती आणि दूधधारी मठ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेस नेते प्रमोद दुबे आणि भाजप नेते ब्रिजमोहन अग्रवाल आणि विष्णू देव साई यांनीही सहभाग घेतला. याआधी हरिद्वार येथील वादग्रस्त धर्म संसदमध्ये वक्तव्य करणारे स्वामी प्रबोधानंद गिरी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharm sansad religious leader praises nathuram godse and abuses mahatma gandhi fir files in raipur hrc