तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केल्यानं इंधन दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवल्याने देशात अनेक ठिकाणी पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांच्या वर गेले आहे. अशात इंधन दर वाढीला कंटाळून बिहारमधील एका व्यक्तीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने सोमवारी दिली. मुजफ्फरपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कच्च्या तेलाची किंमत बरीच कमी असल्याचे सांगत तक्रारदार तमन्ना हाश्मी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमागे पेट्रोलियमंत्र्यांनी कट रचल्याचा आरोप केला आहे. पेट्रोलच्या किंमतींमुळे देशातील लोक संतापले आहेत, असा आरोपही हाशमी यांनी केला.

प्रधान यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिते(आयपीसी)च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कलम ४२० (फसवणूक), २९५ आणि २९५(अ) हेतुपुरस्सर द्वेषपूर्ण कृत्य आणि ५११ (गुन्हा करण्याचा प्रयत्न) संबंधित आहेत. ही याचिका योग्य वेळी सुनावणीसाठी घेण्यात येईल अशी अपेक्षा हाश्मी यांनी केली  आहे.

काँग्रेसच्या सरकारमुळेच इंधन दरवाढीचा भडका उडालाय; पेट्रोलियम मंत्र्यांचा आरोप

याआधीही बर्‍याच मुद्द्यांवर उठवला होता आवाज

तमन्ना हाश्मी हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि राजकारण्यांविरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून न्यायालयीन तक्रारी केल्या आहेत. २४  जून रोजी योगगुरु रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आणि आरोप केला की कोविड -१९ वरील औषधाची निर्मितीकरुन लाखो लोकांचे जीवन धोक्यात आणले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टाने ३० जूनची तारीख दिली आहे.

Explained: इंधनदरवाढीमागे ऑइल बॉन्ड असल्याचं मोदी सरकार सांगतंय, पण ‘ऑइल बॉन्ड’ म्हणजे काय?

तेजस्वी यादव यांचे बेपत्ता असल्याचे लावले होते पोस्टर

२०१९ मध्ये हाश्मी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावली होती. तसेच त्यांच्याविषयी माहिती देणाऱ्याल ५१०० रुपये रोख देण्यात येईल असे सांगितले होते. यादव २०१९ च्या लोकसभा निकालापासून हरवले आहेत असे त्यावर लिहिले होते.