नवी दिल्ली : दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानाला तब्बल ३० तास उशीर झाल्यामुळे २००पेक्षा जास्त प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तांत्रिक बिघाड, कार्यरत नसलेली वातानुकूलन यंत्रणा आणि पेलोडच्या समस्या यामुळे हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ‘एअर इंडिया’ला विमानांना होणारा उशीर आणि प्रवाशांची काळजी घेण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून कारणे दाखवा नोटीस बजावली. ‘एअर इंडिया’कडून माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>> ट्रम्प यांचा अध्यक्षपदावर दावा कायम; रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा, बायडेन यांच्यावर पक्षपाताचा आरोप

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हे विमान गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उड्डाण करणार होते. आधी त्याला सहा तास उशीर होऊन त्याचे उड्डाण शुक्रवारी होईल अे सांगण्यात आले. शुक्रवारी, हे बोईंग ७७७ विमान ११ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, त्यामध्ये बदल होऊन त्याची वेळ दुपारी तीन वाजता निर्धारित करण्यात आली. त्यालाही पुढे उशीर होऊन संध्याकाळी ५.४५ वाजता विमान उड्डाण करेल असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने त्यानंतरही उड्डाण केलेच नाही.

होणाऱ्या उशिरासाठी आधी तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, त्यानंतर पेलोडची समस्या असल्याचे लक्षात आले. या सगळ्या गोंधळात लहान मुलांचे आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.