रांची : खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ठिकाणांमधून आणि संबंधित व्यक्तींकडून मोठया प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. याबाबत त्यांचे स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनी रविवारी सांगितले. मात्र, ही धीरज साहू यांची वैयक्तिक बाब असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचेही पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी सांगितले, की धीरज साहू काँग्रेसचे खासदार आहेत. एवढी मोठी रक्कम त्यांच्या ताब्यात कशी आली हे सांगणारे अधिकृत निवेदन त्यांनी द्यायला हवे. प्राप्तिकर विभागाने ओडिशास्थित ‘बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि त्याच्याशी संबंधित संस्थांवर टाकलेल्या छाप्यांत जप्त केलेली रक्कम आतापर्यंतच्या ‘प्राप्तिकर’च्या एकाच छाप्यात जप्त केलेली सर्वात मोठी रक्कम ठरली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की छाप्यादरम्यान साहूंशी संबंधित परिसराचीही झडती घेण्यात आली. जप्त केलेली रक्कम २९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हेही वाचा >>> ठरलं, ‘इंडिया’ आघाडीची चौथी बैठक ‘या’ दिवशी होणार, लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता

पांडे यांनी सांगितले, की प्राप्तिकर विभागाने ही छापेमारी आणि जप्त केलेल्या रकमेबाबत अद्याप कोणतेही  अधिकृत निवेदन दिलेले नाही. मात्र, यावरून काँग्रेसवर करण्यात येणारे आरोप दुर्दैवी आहेत. धीरज साहू हे या व्यवसायाचा फक्त एक घटक आहेत. पण एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कशी आली हे  त्यांनी स्पष्ट करावे.

काँग्रेस मुख्यालयात बोलताना पांडे यांनी देशातील विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला. झारखंडमध्ये ज्या दिवसापासून आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून भाजप हे सरकार अस्थिर करण्याचा कट रचत आहे.  केवळ झारखंडमध्येच नव्हे तर देशातील लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून आलेल्या सर्व बिगरभाजप सरकारांच्या विरोधात ‘ऑपरेशन लोटस’अंतर्गत षडय़ंत्र रचले जात आहे. कोणत्याही संवैधानिक मूल्यांची पर्वा न करता भाजप हे उघडपणे करत आहे.

काँग्रेसचा हात झटकण्याचा प्रयत्न : भाजप पांडे यांच्या दाव्यास प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि रांचीचे आमदार सी. पी. सिंह म्हणाले, काँग्रेस आपल्या श्रेष्ठींना वाचवण्यासाठी साहूशी आपला संबंध नसल्याचे सांगत आहे. याप्रकरणी ते आपले हात झटकू पाहत आहेत. काँग्रेसचे खासदार साहू अपक्ष आहेत का? ते अपक्ष उमेदवार असते तर पक्षाचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणू शकले असते.