धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे. काही लोक देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, असं म्हणतात असा आरोप धीरेंद्र शास्त्रींनी केला. तसेच ज्यांना असं वाटतं त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं, असं आव्हान दिलं. ते शनिवारी (२७ मे) गुजरातमध्ये आयोजित बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात बोलत होते.
धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले, “बागेश्वर धाममधील माझ्या वेड्यांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी गुजरातचे लोक अशाप्रकारे संघटित होतील त्या दिवशी भारतच काय, मी पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन. इथले लोक म्हणतात की हिंदू राष्ट्र कसं शक्य आहे. हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि यापुढेही राहील. जे म्हणतात देव नसतो, दिव्य शक्ती नसते, हे सर्व ढोंगी आहेत, त्यांनी बागेश्वर बालाजीच्या दरबारात यावं.
“मी गुजरातच्या नागरिकांची दिशाभूल करायला आलो नाही”
“मी गुजरातच्या नागरिकांची दिशाभूल करायला आलो नाही, तर जागरुक करण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत गुजरात हनुमानमय, राममय होत नाही तोपर्यंत मी गुजरातच्या लोकांचा पाठपुरवा सोडणार नाही,” असं मत धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना वाय दर्जाची सुरक्षा, मध्य प्रदेश सरकारचे आदेश; शास्त्री म्हणाले, “हिंदूराष्ट्र…”
“मी महात्मा नाही, चमत्कार करणारा गुरू नाही”
“मी महात्मा नाही, चमत्कार करणारा गुरू नाही, सिद्धपुरुष नाही आणि देवही नाही. मीही तुमच्यासर्वांसारखा सर्वसाधारण माणूस आहे. मला इतकंच माहिती आहे की, बालाजी माझे आहेत आणि मी बालाजींचा आहे,” असंही धीरेंद्र शास्त्रींनी नमूद केलं.