‘खोसला का घोसला’ चित्रपटाच्या यशात आमचाही वाटा आहे त्यामुळे आम्हाला न विचारता चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा अधिकार दिबाकर बॅनर्जींना कोणी दिला? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बॅनर्जींवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांचा विरोध करत साहित्यिकांपाठोपाठ चित्रपट दिग्दर्शकांनीही पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. यामध्ये १० दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटांना मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले. या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘खोसला का घोसला’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जींचाही समावेश आहे. पुरस्कार परत करण्याच्या बॅनर्जींच्या भूमिकेवर अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त करत ‘खोसला का घोसला’ चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कारात बॅनर्जींसह माझा आणि चित्रपटातील प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे आम्हाला न विचारता बॅनर्जींना पुरस्कार करण्याची घोषणा करण्याची काहीच गरज नव्हती, असे सडेतोड मत अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे.

…ही तर ‘पुरस्कारवापसी गँग’, अनुपम खेर यांची सडकून टीका

दरम्यान, खेर यांनी गुरूवारी ट्विटच्या माध्यमातून दिग्दर्शकांवर निशाणा साधला होता. खेर यांनी पुरस्कार परत करणाऱयांचा उल्लेख ‘पुरस्कारवापसी गँग’ असा केला होता. या ‘पुरस्कारवापसी गँग’ने केवळ सरकारचाच नाही तर परिक्षक तसेच ज्या प्रेक्षकांनी यांच्या चित्रपटांना यशाच्या शिखरावर नेलं त्या सगळ्यांचाच अपमान केला असल्याचेही खेर म्हणाले.