Dibrugarh Express Accident : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गोंडापासून ३० किलोमीटर दूर झिलाही रेल्वेस्टेशनच्या जवळ घडली आहे. प्रशासनाने बचाव पथकं गोंडाकडे रवाना केली आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या अपघातामुळे गोरखपूर ते लखनौ डाऊन दिशेच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात रेल्वेगाड्या रूळ रिकामा होण्याची वाट पाहत उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने झिलाहीच्या दिशेने धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. तसेच रेल्वेप्रशासनाने प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. ८९५७४०९२९२, ८९५७४००९६५ हे दोन हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

हे ही वाचा >> Hathras Stampede : भोले बाबांकडून असंवेदनशीलतेचा कळस, हाथरस दुर्घटनेबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या जगात…”

रेल्वेने डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे

आरपीएफ व रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचंही एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. यासह वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं असून डब्यांमध्ये डकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचारांसाठी एक वैद्यकीय पथकही काही वेळात घटनास्थळी पोहोचेल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. दरम्यान, या अपघातानंतर गोंडा-झिलाही मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर रेल्वेगाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात गाड्या उभ्या आहेत.

Dibrugarh Express derail in Gonda
डिब्रुगड एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले

हे ही वाचा >> Video: शेतकरी अचानक जमिनीवर झोपून गोल फिरत ओरडू लागला; जिल्हाधिकारी कार्यालयात सारेच बुचकळ्यात, नेमकं झालं काय?

दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचं एका प्रवाशाने सांगितलं. ही एक्सप्रेस चंदीगडहून डिब्रुगडला जात होती. गोंडा स्थानकातून बाहेर पडून २० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर झिलाही स्थानकाच्या आधी एक्सप्रेस रुळावरून घसरून हा अपघात झाला. रेल्वेचे आठ ते दहा डबे रुळावरून घसरल्याचं प्रवाशाने सांगितलं. या अपघातामुळे रेल्वेचे रूळही उखडले आहेत.