पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. तसंच, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १९५९ सालातील एका भाषणाचाही उल्लेख केला. त्यानुसार, पंडित जवाहरलाल नेहरू भारतीयांना आळशी समजत असत, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत काय म्हणाले?

“भारतात अधिक मेहनत करण्याची सवय नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात. हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झालेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे”, म्हणजे नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते. भारतीय कमी अक्कल असलेले आहेत”, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा >> ‘पंडित नेहरु भारतीयांना आळशी, कमी अक्कल असलेले समजत’, पंतप्रधान मोदींची नेहरुंवर टीका

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून नेमकं काय म्हटलं होतं?

जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात लाल किल्ल्यावरून म्हटलं होतं की, “भारतीयांमध्ये कष्ट करण्याची सवय नाही. यात आपला दोष नाही, कधी कधी अशा सवयी तयार होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही. हे देश चमत्कारीतपणे एका रात्रीत विकसित झाले आहेत असं नाही. कठोर परिश्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे हे देश विकसित झाले आहेत.” इंडिया टुडेने या वि,यीचं वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधींबद्दल काय म्हणाले?

“तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही विचारसरणी वेगळी नव्हती. त्यांनी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, आपली कामं पूर्णत्वास जातात तेव्हा आपण आत्मसंतुष्य असतो आणि जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण नाऊमेद होतो. कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे. आजच्या काँग्रेसकडे लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील लोकांचे आकलन चुकीचे केले असेल. पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते”, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.