बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही, असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. संसदेत आपल्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि त्याच्यावर अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप केल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
“मी बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी राजकारणात सामील झालो नाही. मी देशाच्या तरुणांच्या फायद्यासाठी सामील झालो”, असं खान पंजाब प्रांतातील हाफिजाबाद शहरात एका राजकीय सभेत बोलताना म्हणाले. खान पुढे म्हणाले की, “पैशाचा वापर करून कायदे करणाऱ्यांना विकत घेऊन त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांच्या विरोधात राष्ट्र उभे राहील.ते म्हणाले की त्यांच्या उर्वरित कार्यकाळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे आणि त्यांच्या सरकारने जाहीर केलेल्या योजनांचे परिणाम लवकरच दिसून येतील.
क्रिकेटर म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेले आणि आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असलेले इम्रान खान आपण देशाच्या तरुणांच्या फायद्यासाठी राजकारणात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगतात. “मी बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी राजकारणात सामील झालो नाही. मी देशाच्या तरुणांच्या फायद्यासाठी सामील झालो”, असं खान म्हणाले.