आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे डिझेल प्रतिलिटर एक रुपयाने तर पेट्रोल प्रतिलिटर पावणेदोन रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून मंगळवारी संध्याकाळी या दर कपातीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे तेल कंपन्यांना होणारा तोटा कमी करण्यासाठी डिझेलचे दर प्रत्येक महिन्याला वाढविण्यात येत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी तेल कंपन्या दरकपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. आयात केलेल्या कच्च्या तेलाचे प्रतिपिंप दर आणि किरकोळ विक्री किंमत यातील फरक समान झाला असून, आता तेल कंपन्यांना विक्रीमागे प्रतिलिटर एक रुपया जादा मिळत आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा