पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आज संपूर्ण देश राममय झाला असल्याची भावना व्यक्त केली. पण हा आनंद फक्त भारतात साजरा करण्यात आला नाही. तर साता समुद्रापार अमेरिकेतही सेलिब्रेशन सुरु होतं. अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्क्वेअर येथे प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा झळकली. याआधी ही प्रतिमा झळकावण्यावरुन मतांतर होती. त्यामुळे याबाबत अनिश्चितता होती. मात्र अखेर ही प्रतिमा पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली.

टाइम्स स्क्वेअरवरील स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर प्रभू रामांची प्रतिकृती झळकवली गेली. जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर ही असल्याने तिला अधिक महत्व आहे.

मुस्लिमांनी केला होता विरोध
टाइम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डची मालकी असणाऱ्या प्रमुख जाहिरातदार कंपनीने प्रभू रामांची प्रतिमा झळकवण्यासाठी नकार दिला होता. यासंदर्भातील वृत्त क्लिरीयन इंडिया या वेबसाईटने दिलं आहे. अमेरिकेतील काही मुस्लीम समाजासंदर्भात काम करणाऱ्या गटांनी टाइम्स स्क्वेअरवर जाहिराती करणाऱ्या ब्रॅण्डेड साइट्स या कंपनीकडे ५ ऑगस्ट रोजी प्रभू रामांची प्रतिमा टाइम्स स्क्वेअरवर झळकवण्याचे कॅम्पेन करु नये अशी मागणी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखेर अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सोहळ्यासाठा उपस्थित होते.