मध्य प्रदेशातील रतनगढ येथील मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला. 
मध्य प्रदेशात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११५वर
दातिया जिल्ह्यातील रतनगढ येथील मंदिराच्या मार्गावर असलेल्या नदीवरील पूल कोसळत असल्याच्या अफवेमुळे रविवारी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११५ भाविक मृत्युमुखी पडले असून, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करताना दिग्विजय सिंह म्हणाले, यात्रेच्या मार्गावरील वाहतूकबंदी असलेल्या क्षेत्रात पोलीस ट्रॅक्टरचालकाकडून २०० रुपये घेऊन त्यांना प्रवेश देत होते. हेच का मध्य प्रदेशातील सुप्रशासन? २००६ साली याच ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार काहीही शिकलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
२००६ साली सिंध नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ५६ भाविक वाहून गेले होते. रविवारच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना दिग्विजय सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Story img Loader