काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीतील सत्ता घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने त्यांचा पक्ष पूर्ण करेल, याची मला खात्री आहे, अशा आशयाचे ट्विट दिग्विजय यांनी केले आहे. सध्याच्या काळात राजकारणावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, मात्र केजरीवाल यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे राजकारण व निवडणुकींवर तोंडसुख घेणारे अनेक जण राजकारणाकडे वळतील, अशी आशाही त्यांनी या ट्विटमध्ये केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाने भाजपच्या खालोखाल म्हणजे २८ जागा जिंकून सर्वाना चकित केले होते. काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिल्याने ४५ वर्षीय केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा