भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे मत कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी व्यक्त केले. मणिशंकर अय्यर यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत, त्यांना हवे असेल, तर त्यांनी आमच्या बैठकीमध्ये येऊन चहा वाटावा, अशा आशयाचे विधान गेल्या आठवड्यात मणिशंकर अय्यर यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या बैठकीत केले होते. त्यावर विविध स्तरांतून टीका करण्यात आल्यानंतर दिग्विजय सिंह यांनीही आपण या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले.
आपल्या देशामध्ये अतिशय विषम परिस्थितीतून प्रगती करीत लोक राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळेच मणिशंकर अय्यर यांनी या पद्धतीने विधान करणे चुकीचे आहे, असे मत दिग्विजय सिंह यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांकडे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा