काँग्रेस पक्षाची धुरा आता युवकांच्या हाती सोपवावी अशी मागणी ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. पक्षासमोर अनेक आव्हाने असल्याने अन्य पर्याय उरलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करावे, असा जोरदार मतप्रवाह पक्षात असतानाच दिग्विजयसिंह यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
आता युवकांच्या हाती धुरा सोपविणे गरजेचे आहे, अन्य कोणताही पर्याय नाही, आपण शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे म्हटले तेव्हा काहींनी त्याला हरकत घेतली, मात्र धुरा युवकांच्या हातीच गेली पाहिजे, ते पक्षासाठी गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh comment on congress party