मध्य प्रदेशात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या हायकमांडची कानउघडणी केली आहे. काँग्रेसची संघटना कमकुवत झाली आहे. मतदानाच्या दिवशीही सुद्धा काँग्रेसचं निवडणूक व्यवस्थापन कमकुवत असते, असं मत दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे.

मध्य प्रदेशातील सिहोर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह म्हणाले, “काँग्रेस पक्ष संघटित नाही, हे मान्य करायला हरकत नाही. मतदानाच्या दिवशी निवडणूक व्यवस्थापनात फार मोठी कमतरता असते. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी करण्यात येत नाही. लोकांना काँग्रेसला मतदान करायचे, आहे. पण, आमची संघटना कमकुवत असल्याने ते करू शकत नाहीत,” अशी खंतही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

हेही वाचा : अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून घेतलं ताब्यात, लंडनला पळून जाण्याच्या होती तयारीत

“राज्यात पराभव झालेल्या जागांना भेटी देऊन अहवाल तयार केला जाईल. तो अहवाल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडं सोपण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीसाठी नवीन पद्धतीने रणनीती आखण्यात येणार आहे,” असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO : निवडणुकीच्या आधी कर्नाटकात पैशांचा खेळ? कारमध्ये सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

दरम्यान, मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. २०१८ साली ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला, त्याठिकाणी दिग्विजय सिंह भेटी देत आढावा घेत आहेत. दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशातील ६६ जागांचा अहवाल तयार केला आहे.