वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र शेअर करून पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. दिग्विजय सिंह यांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एकत्रित छायाचित्र ट्विट केले आहे. छायाचित्रात अर्धा चेहरा मोहन भागवत यांचा तर, अर्धा चेहरा असदुद्दीन ओवेसी यांचा दाखविण्यात आला आहे. हे छायाचित्र शेअर करताना दिग्विजय यांनी देशात या दोन चेहऱयांमुळे धार्मिक सलोखा बिघडत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे दिग्विजय यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिग्विजय यांनी मोहन भागवत यांच्यासोबत माझे छायाचित्र जोडून मुस्लिमांचा अपमान केल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच दिग्विजय सिंह यांनी आपल्या मुलाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले होते. मग, ती छायाचित्रेही दिग्विजय यांनी ट्विट करावीत, असे प्रत्युत्तर ओवेसी यांनी दिले.

Story img Loader