केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती उघड केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने मुक्त शिक्षण विभागाच्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबित केले होते. मात्र, स्मृती इराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे. त्याचवेळी राजकारणात अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे , असे स्मृती इराणींनी ट्विटरवरून सांगितले.
In public life one should be open to scrutiny and criticism. So am I.
— Smriti Z Irani (@smritiirani) May 31, 2014
Since DU is an autonomous institution I have put forth my personal appeal to the VC to reinstate the officials.
— Smriti Z Irani (@smritiirani) May 31, 2014
तर दुसरीकडे या अधिकाऱ्यांच्या निलंबनप्रकरणी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंना या अधिकाऱ्यांचे निलंबन घेण्याची मागणी केल्याबद्दल दि्ग्विजय सिंहांनी स्मृती इराणींचे जाहीर आभार मानले असून, आता देशातील जनतेसमोर त्यांची खरी शैक्षणिक पात्रता आली पाहिजे असे सांगितले.
5 officials of Delhi University suspended for leaking HRD Minster’s educational qualification details!Does this Govt believe in transparency
— digvijaya singh (@digvijaya_28) May 31, 2014
Thanks Smriti for appealing to VC DU for reinstating DU officials. Now let people of this Country know your actual Educational Qualification
— digvijaya singh (@digvijaya_28) May 31, 2014