केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती उघड केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने मुक्त  शिक्षण विभागाच्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबित केले होते. मात्र, स्मृती इराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली आहे. त्याचवेळी राजकारणात अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे , असे स्मृती इराणींनी ट्विटरवरून सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 



तर दुसरीकडे या अधिकाऱ्यांच्या निलंबनप्रकरणी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंना या अधिकाऱ्यांचे निलंबन घेण्याची मागणी केल्याबद्दल दि्ग्विजय सिंहांनी स्मृती इराणींचे जाहीर आभार मानले असून, आता देशातील जनतेसमोर त्यांची खरी शैक्षणिक पात्रता आली पाहिजे असे सांगितले. 
 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijaya singh takes a dig at smriti irani as she appeals to du vice chancellor to reinstate suspended officials