* मोदींच्या तथाकथीत ‘विकास मॉडेल’वर  दिग्विजय यांचे टीकास्त्र
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकात्मक ट्विट केले आहे. त्यांनी मोदींच्या गुजरातमधील विकासाच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
दिग्विजय यांनी तेंडुलकर मेथोडोलॉजीच्या अभ्यासानुसार, मोदींच्या राज्यात गरिबीचे प्रमाण कमी होत असल्याचे खोटे चित्र उभे करण्यात आले आहे. असे ट्विट सिंग यांनी केले. तसेच, मोदींच्या विकास मॉडेलवर टीका केल्यामुळे प्रत्युत्तरामध्ये मोदी समर्थकांकडून आपल्याविरुद्ध अपमानास्पद शब्द ऐकावयास मिळतील, अशी अपेक्षाही दिग्विजय यांनी व्यक्त केली.
“मोदींनी या विकासाच्या मुद्द्यावर वादविवादाकरिता आव्हान करतो. पण, त्यास सामोरे जाण्याकरीताही त्यांच्याकडे पुरेसे सामर्थ्य नाही” असे दुस-या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. आगामी निवडणूकांच्या प्रचाराकरिता मोदी कानपूरला गेले असतानाच दिग्विजय यांनी मोदींवर हा टोला लावला आहे. सूत्रांनुसार, कल्याण सिंगदेखील मोदींच्या कानपूर मेळाव्याबद्दल बोलण्याची शक्यता आहे.