पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्या शहराला येत्या काही वर्षांमध्ये दररोज तीन लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा शहराच्या पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य वास्तुविशारद दीक्षू कुकरेजा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना व्यक्त केली आहे. जगभरातील धार्मिक शहरांच्या धर्तीवर अयोध्येचा पुनर्विकास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॅटिकन शहर, कंबोडिया, जेरुसलेम, तिरुपती आणि अमृतसर यासारख्या शहरांचा त्यासाठी अभ्यास केला जात असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. पुनर्विकास करताना उपलब्ध जमिनीचा कार्यक्षम वापर, कमीत कमी दाटीवाटी, येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी धर्मशाळा व घरगुती राहण्याची व्यवस्था, शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप कायम ठेवून पायाभूत सुविधांचा विकास ही या आराखडय़ाची काही वैशिष्टय़े आहेत असे कुकरेजा म्हणाले.

हेही वाचा >>>वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पंतप्रधानपदाची जबाबदारी, फ्रान्समध्ये गॅब्रिअल अटल ठरले पहिले समलिंगी पंतप्रधान!

ते म्हणाले की, ‘‘अयोध्या हे जागतिक पर्यटनाचे स्थळ होण्याची अपेक्षा आहे, त्यामध्ये आध्यात्मिक, सांस्कृतिक, वारसा ठेवा आणि कार्यक्रम यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे येथे आदरतिथ्य आणि संबंधित उद्योगांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे’’.पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अयोध्येत रस्ते, पूल, सांडपाणी व्यवस्था आणि इतर सोयीसुविधांची रचना करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dikshu kukreja statement that ayodhya will be redeveloped on the lines of religious cities around the world amy