निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्या शिंदे तेथील मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा होती. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडून आलेले आमदार आपल्या मुख्यमंत्र्यांची निवड करतात ही काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. या वर्षअखेरीला मध्य प्रदेशात निवडणूक होणार असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे, अशी अटकळ बांधली जात आहे.

Story img Loader