पीटीआय, कोलकाता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर त्यांची कन्या सायमा वाजेद या जी-२० साठी आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेविषयी चर्चाना उधाण आले आहे. बांगलादेशमधील सत्ताधारी अवामी लीग या पक्षात त्यांच्याकडे मोठी भूमिका सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सायमा वाजेद उपस्थित राहत असलेली ही दुसरी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद आहे. याच आठवडय़ात त्या बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शाहबुद्दीन यांच्याबरोबर आसियान परिषदेसाठी इंडोनेशियाला गेल्या होत्या. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शेख हसीना यांच्याबरोबर वाजेद प्रथमच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध पाहता, वाजेद यांच्या भारत दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारताचे बांगलादेशमधील राजदूत सर्वजीत चक्रवर्ती म्हणाले की, ‘अवामी लीगमध्ये उत्तराधिकारी कोण, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. पुढील नेता लोकशाही पद्धतीनेच निवडला जाईल असा आमचा विश्वास आहे’. त्याचवेळी पुढील नेता राजकीय कुटुंबातून नसेलच असे नाही असेही त्यांनी सूचित केले.सायमा वाजेद या स्वमग्नता (ऑटिझम) या विकाराच्या तज्ज्ञ आहेत.