अफझल गुरू याच्या कुटुंबियांना त्याच्या फाशीची माहिती विलंबाने कळविण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. अफझल गुरू याला गेल्या शनिवारी फाशी देण्यात आले. फाशीच्या या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच त्याच्या कुटुंबियांना कळविणे आवश्यक होते, असे पंतप्रधानांनी शिंदे यांना स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी राष्ट्रपती भवनात राज्यपालांची परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान पंतप्रधानांनी शिंदे यांच्याकडे आपले हे मत व्यक्त केले.

Story img Loader