सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कावेरी पाणीवाटपावरून गुरुवारी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र दोन्ही मुख्यमंत्री आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने या चर्चेतून कोणताही मार्ग निघू शकला नाही. कावेरीतून तामिळनाडूला केवळ ३० टीएमसी इतकेच पाणी द्यावे, अशी माफक मागणी आपण केल्याचे मुख्यमंत्री जयललिता म्हणाल्या. तथापि, कर्नाटकने एक थेंबही पाणी देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली, असे जयललिता यांनी सांगितले. दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. कर्नाटकमध्येच पाण्याची टंचाई भासत असल्याने तामिळनाडूसाठी पाणी देण्यासारखी स्थिती नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले. कावेरी पाण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनक्षम असल्याने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेद्वारे सर्वमान्य तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली होती.
कावेरी प्रश्नावर तोडगा नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कावेरी पाणीवाटपावरून गुरुवारी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मात्र दोन्ही मुख्यमंत्री आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने या चर्चेतून कोणताही मार्ग निघू शकला नाही.
First published on: 30-11-2012 at 05:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over the cauvery river has ended without a solution