‘द्रमुक’चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. करुणानिधी हे ९६ वर्षाचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कावेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटिनमधून देण्यात आली आहे.

करुणानिधी यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी नलिका बदलण्यासाठी कावेरी रुग्णालयाच्या युनिटकडे नेण्यात आले होते. मात्र सध्या वैद्यकीय पथकाकडून करुणानिधी यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि रुग्णालयातील सेवांप्रमाणे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवण्यात येत असल्याचीही माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

Story img Loader