द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे नेते करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार होणार की नाही, यासंदर्भात मद्रास हायकोर्ट आज सकाळी आठ वाजता निर्णय देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी सकाळी आठ वाजता घेण्यात येईल, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाचदा भूषवणारे आणि डीएमके प्रमुख तसेच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ९४ वर्षांचे होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत शोककळा पसरली आहे. मात्र, करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारावरुन वाद निर्माण झाला आहे.

करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने निर्माण झाला. सरकारने गांधीमंडपम येथील दोन एकर जागा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, करुणानिधी यांच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी या जागेस नकार दिला. शेवटी या प्रकरणी डीएमकेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

मद्रास हायकोर्टाचे हंगामी मुख्य न्यायाधीश हुलुवदी जी. रमेश यांच्या निवासस्थानी या याचिकेवर सुनावणी झाली.
मरीना बीच येथे जयललिता यांच्या स्मारकाविरोधात डीएमकेच्या वकिलांनी याचिका दाखल झाली होती. या याचिका मागे घेण्यात आल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली. यानंतर तामिळनाडू सरकारने बाजू मांडण्यासाठी आणखी काही वेळ हवा, असे हायकोर्टात सांगितले. यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावर आज (बुधवारी) सकाळी आठ वाजता सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.