पीटीआय, चेन्नई
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने (डीएमके) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करण्याची घोषणा या जाहीरनाम्याद्वारे करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीला विजय मिळल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा, २०१९ रद्द करण्याचे आश्वासन दिले. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे आणि तेथे निवडणुका घेणे, नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करणे, इंधनाच्या किमती कमी करणे, राज्यपालांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारे घटनेचे कलम ३६१ रद्द करणे आणि मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून राज्यपालांची नियुक्ती करणे या गोष्टींचा उल्लेख आहे. समान नागरी कायद्याला प्रतिबंध केला जाईल असे पक्षाने स्पष्ट केले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत कामाच्या दिवसांची संख्या १०० वरून १५० दिवसांपर्यंत वाढवली जाईल.
हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर, “औरंगजेब हे १०४ थं दुषण…”
ठळक बाबी
● पद्दुचेरीला राज्याचा स्वतंत्र दर्जा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न.
● महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाबरोबर देशातील महिलांना दहमहा १००० रुपये खात्यात जमा करण्याचे आश्वासन
● नीट वर बंदी घालून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एईपी) मागे घेण्यात येईल.
● पेट्रोल ७५ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६५ रुपये प्रतिलिटर दराने देण्याचे आश्वासन देण्यात आले .