शैक्षणिक मुल्यांची चाड नसणाऱ्या आणि बिनकामाच्या पदव्या देणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यात अडकू नका, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ते शनिवारी नोएडा येथील पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजन यांनी शैक्षणिक कर्ज काढणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला. अभ्यासक्रमासाठी मोठे शुल्क आकारून बिनकामाच्या पदव्या देणाऱ्या व शैक्षणिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यात विद्यार्थ्यांनी सापडू नये, असे त्यांनी सांगितले. भविष्यात चांगल्या शैक्षणिक संस्थातील शिक्षण महागच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांच्यात क्षमता आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण मिळण्याची आवश्यकता राजन यांनी व्यक्त केली.
बिनकामाच्या पदव्या देणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यात अडकू नका- रघुराम राजन
राजन यांनी शैक्षणिक कर्ज काढणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला.
First published on: 07-05-2016 at 15:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not fall in trap of schools giving useless degrees warns raghuram rajan