कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी यांनी सोलापूर आणि सांगलीतील गावांवर दावा सांगितला होता. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न चिघळला आहे. त्यात महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे कर्नाटकडून पुन्हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं जातं आहे.

अशात कर्नाटक विधिमंडळात बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही महाराष्ट्रावर आगपाखड केली. “कर्नाटकातील एक इंचही महाराष्ट्राला देऊ नका. अशा पद्धतीचे पत्र संसदेच्या दोन्ही सभागृहाला द्या,” अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बसवराज बोम्मई यांनी म्हटलं की, “सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत झाल्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहाला पत्र पाठवेन,” असं बोम्मईंनी सांगितलं.

हेही वाचा : “सोनिया गांधींच्या दरबारातील कुत्रे…”, खरगेंवर टीका करताना भाजपा आमदाराची जीभ घसरली

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सिद्धरामय्या यांनी ट्वीट करत बोम्मई यांच्यावर टीका केली आहे. “सीमाप्रश्न सातत्याने ज्वलंत ठेवणे हा महाराष्ट्राचा डाव आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमाप्रश्नावरून बैठक बोलवायला नको होती. तसेच, या बैठकीत मुख्यमंत्री बोम्मई यांनी उपस्थित राहायला हवे नको होतं,” असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार? अरविंद सावंत भाजपावर संतापले; म्हणाले, “सत्तेशिवाय…”

“महाराष्ट्र आणि कर्नाटक मंत्र्यांची समिती स्थापन करणे योग्य नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी याला स्पष्ट नकार दिला असेल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे अमित शाहांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सीमाभागात सुरु असलेली आंदोलने थांबवण्यासाठी समज द्यायला हवी होती,” असेही सिद्धरामय्यांनी म्हणाले.