पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रसंघात भारताशी निगडित प्रश्न तडफेने मांडतील, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही दिग्विजय सिंह यांनी दिला.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मोदी भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत राजकारण करण्याची ही वेळ नाही. भारताशी निगडित प्रश्न ते पूर्ण तडफेने मांडतील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तुटल्याबद्दल विचारले असता दिग्विजय सिंह म्हणाले की, सध्या राजकीय विचारसरणींवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे सावट पसरले आहे आणि हे देशासाठी चांगले संकेत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा