पीटीआय, बंगळूरु

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत सुमारे ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बंगळूरु पोलिसांनी एका डॉक्टर आणि त्याच्या सहायक तंत्रज्ञाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.पोलिसांनी सांगितले, की डॉ. चंदन बल्लाळ आणि त्याचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ निसार यांनी म्हैसूर जिल्हा मुख्यालयातील एका रुग्णालयात केलेल्या प्रत्येक गर्भपातासाठी ३० हजार रुपये घेतले आहेत. रुग्णालय व्यवस्थापक मीना आणि कर्मचारी रिझमा खान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.

Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Mumbai, murder MNS worker Mumbai,
मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
man dies in kerala hospital after treated by fake doctor
धक्कादायक! १२ वर्षांपासून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण करू न शकणाऱ्या बोगस डॉक्टरकडून रुग्णावर उपचार; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
youth congress taluka president rape
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Badlapur Crime News
Badlapur : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शाळा संचालक आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, उच्च न्यायालयाचा निर्णय

गेल्या महिन्यात, शिविलगे गौडा आणि नयन कुमार हे दोन आरोपी एका गर्भवती महिलेला मोटारीतून गर्भपातासाठी घेऊन जात होते. तेव्हा या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हैसूरजवळील मंडय़ा जिल्हा मुख्यालयात लिंगनिदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता.चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मंडय़ातील एका गुऱ्हाळात लिंगनिदान केंद्र चालवले जात होते. हे केंद्र चालवण्यासाठी संबंधितांकडे कोणतेही वैध प्रमाणपत्र किंवा अन्य अधिकृत दस्तावेज नव्हते. आरोपी डॉक्टरने गेल्या तीन वर्षांत त्याच्या साथीदारांच्या मदतीने म्हैसूर रुग्णालयात सुमारे ९०० अवैधरीत्या गर्भपात केले असे प्राथमिक तपासात उघड झाले  आहे. प्रत्येक गर्भपातासाठी तो ३० हजार रुपये आकारत असे.