जगभरात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच त्यावरून रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. नरेंद्र मोदी स्वत: योगासने करतात का, असा सवाल पुतिन यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
नरेंद्र मोदी यांनी योगाला मानाचे स्थान दिले आणि त्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयही स्थापन करण्यात आले. त्या धर्तीवर रशियातही तशा प्रकारचे मंत्रालय स्थापन करणार का, असा सवाल पुतिन यांना केला असता त्यांनी, प्रत्येकाने त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे का, असा प्रतिसवाल केला. आपले विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे असे निदर्शनास येताच पुतिन म्हणाले की, नरेंद्र मोदी एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे, आपली त्यांच्याशी मैत्री आहे. मोदी आणि पुतिन हे कणखर नेते आहेत असे बोलले जाते त्याबाबत विचारले असता आपण कणखर नाही, तडजोडीला तयार असतो, मात्र इतरांनी ठाम भूमिका घेतली तर आपण लवचीकता दर्शवितो.
नरेंद्र मोदी स्वत: योगासने करतात का?
जगभरात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच त्यावरून रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे.
First published on: 21-06-2015 at 12:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does modi do yoga asks vladimir putin