घराणेशाहीमुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शहजादे असे म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सुखबीरसिंग बादल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शहजादे म्हणतील का? असा प्रश्न काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसने वंशवाद सोडावा, मी शहजादे म्हणणे सोडेन – मोदी
नरेंद्र मोदींनी पाटणा येथील सभेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करत, काँग्रेसने घराणेशाहीचे राजकारण थांबविले तरच आपण राहुल यांचा उल्लेख शहजादा करणार नाही असे म्हटले. शहजादा हा शब्द मोगल काळात युवराजासाठी वापरला जायचा त्यामुळे साहजिकच ‘शहजादा’ हा शब्द काँग्रेसला भलताच झोंबला आहे. या मोदींच्या मतावर टीका करताना आरपीएन सिंह म्हणाले, “एनडीएतील घटक पक्ष असलेले शिवसेना आणि अकादी दलाच्या सध्याच्या नेत्यांना मोदी शहजादे म्हणतील का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष करण्यात आले. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही पुत्र सुखबीरसिंह बादल यांना शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष केले आहे.यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे”
कोण हा शहजादा?