मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्याची आपली केवळ शिफारस किंवा सूचना नसून, जर अध्यक्षपदी निवडून आलो तर सीरियन शरणार्थीना त्यांची पडताळणी केल्याशिवाय देशात प्रवेश देणार नाही, असे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज चॅनेलला सांगितले, की सीरियातील मुस्लिमांना पुरेशा पडताळणीशिवाय येऊ देणार नाही. मुस्लिमांवर बंदीची केवळ सूचना होती या अलीकडच्या वक्तव्यावर विचारले असता स्पष्टीकरण करताना त्यांनी असे म्हटले आहे, की ‘नाही, तसे काही नाही. ती सूचना वगैरे काही नाही. सीरियातील शरणार्थीना ते जर झुंडीच्या झुंडीने येत असतील तर पडताळणीशिवाय प्रवेश देणार नाही. ते कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही. स्थलांतरं पाहिली तर त्यात अनेक तरुण येत आहेत. महिला, मुले येत आहेत. सीरियातील लोकांना थांबवले जाईल. हजारो लोक देशात येत आहेत, त्यांची कुठली तपासणी होत नाही, कागदपत्रे नाहीत, हे खपवून घेणार नाही. या लोकांना सांभाळण्यासाठी अमेरिकेकडे पैसा नाही. सीरियातच सुरक्षित भाग निर्माण करून या लोकांना तेथे ठेवावे व त्यांचा खर्च आखाती देशांनी करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा