न्यूयॉर्क : आर्थिक फसवणूक प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यूयॉर्क न्यायालयात सोमवारी जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. आपण आपल्या अनेक मालमत्तांचे योग्य मूल्य उघड केले नाही असे त्यांनी यावेळी कबूल केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे भरकटलेले आणि उद्धटपणाचे होते. आपल्या कंपनीने फ्लोरिडामधील मार-ए-लागो आणि डोराल गोल्फ कोर्स या मालमत्तांचे मूल्य कमी करून सांगितले आणि अन्य काही मालमत्तांसह ट्रम्प टॉवरचे मूल्य वाढवून सांगितले, अशी कबुली ट्रम्प यांनी दिली. मात्र, ही कबुली देतानाच मालमत्तांचे अंदाजे मूल्य ही फारशी महत्त्वाची बाब नसल्याचा दावा त्यांना केला.