Donald Trump among 338 nominees for Nobel Peace Prize : जगातिक शांततेसाठी बहुमूल्य योगदान देणार्‍या व्यक्ती तसेच संस्थांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. दरम्यान यंदा हा पुरस्कार कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नॉर्वेजीयन नोबेल इंस्टिटयूटने यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी ३०० हून अधिक व्यक्ती आणि संस्था यांना नामांकित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. एएफपीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस आणि नाटोचे माजी सेक्रेटरी जेन्स स्टॉल्टनबर्ग (Jens Stoltenberg) यांची नावे आहेत.

एकूण ३३८ नामांकने दाखल करण्यात आली असून यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या २८६ च्या तुलनेत ही संख्या खूपच मोठी आहे. दरम्यान आजवर २०१६ मध्ये विक्रमी ३७६ नामांकने दाखल करण्यात आली होती.

नोबेल नियमानुसार नामांकित व्यक्तींची ओळख ५० वर्षांपर्यंत गुप्त ठेवली जाते. परंतु नामांकन करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती त्यांनी कोणाचे नाव नामांकित केले आहे हे जाहीर करू शकतात.

ट्रम्प यांच्या नामांकन चर्चेत

अमेरिकन काँग्रेस सदस्य डॅरेल इस्सा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आपण डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी यासाठी ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त पात्र कोणीच नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. इस्सा यांच्या कार्यालयाने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना मध्य पूर्वेतील राजनैतिक कार्याच्या आधारावर नामांकित करण्यात आले आहे. मात्र हे नामांकन अधिकृत वेळ मर्यादा संपल्यानंतर दाखल करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या वर्षीही नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत होते, मात्र यंदा ट्रम्प यांनी त्यांच्य परराष्ट्र नितीमध्ये केलेल्या मोठे बदल, तसेच युक्रेन रशिया यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे यासंबंधीच्या चर्चांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

कोणती नावे चर्तेत?

नॉर्वेजीयन कायदे मंडळातील सदस्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की त्यांनी स्टॉल्टेनबर्ग, यूएन सेक्रेटरी जनरल अॅन्टोनियो गुटेरस आणि पोप फ्रान्सिस यांची नावे नोबेल पुरस्करासाठी नांमाकित केली आहेत. गाझा, युक्रेन अशा युद्धाच्या झळा सोसत असलेल्या प्रदेशांमधील शांततेसाठी पोप फ्रान्सिस आवज उठवत आले आहेत.

दुसरीकडे फ्रेंच कार्यकर्त्या गिसेल पेलिकॉट (Gisele Pelicot) यांना हा पुरस्कार मिळावा अशी मागणी होत आहे. जानेवारी महिन्यात यूकेमधील हजारो लोकांनी यासंबंधीच्या याचिकेवर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. पूर्वीच्या पतीकडून झालेल्या लैंगिक हिंसाचाराविरोधात धाडस दाखवत उघडपणे बोलल्याबद्दल पेलिकॉट यांचे नाव चर्चेत आले होते.

नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वेजीयन नोबेल समितीकडून दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाते. गेल्या वर्षी हा पुरस्कार जपानच्या अणुबॉम्ब स्फोटातून बचावलेल्यांच्या गट निहोन हिडानक्यो (Nihon Hidankyo) ला देण्यात आला होता.

Story img Loader