वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये शांततापूर्ण आणि अतिशय व्यवस्थित सत्तांतराची प्रक्रिया पार पडेल, असे निवेदन व्हाइट हाउसने जारी केले आहे. अमेरिकेचे विद्यामान अध्यक्ष जो बायडेन आणि नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये दोन तास झालेल्या बैठकीनंतर व्हाइट हाउसने निवेदन प्रसिद्ध केले.

‘अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन तास एकमेकांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. ‘व्हाइट हाउस’चे विद्यामान स्टाफ प्रमुख जेफ झिएन्ट्स आणि नियोजित स्टाफ प्रमुख सुजी वाइल्स हेदेखील नंतर बैठकीला उपस्थित राहिले. बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात पार पडली,’ असे ‘व्हाइट हाउस’चे माध्यम सचिव कॅरिन जीन पिरे यांनी पत्रकारांना सांगितले.

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!
Rohit Pawar On Pune Guardian Minister
Rohit Pawar : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार अजित पवार की चंद्रकांत पाटील? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “शंभर टक्के…”
News About Rahul Narwerkar
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार? राजकीय वर्तुळात चर्चा काय?

कॅरिन म्हणाल्या, ‘अमेरिकेसह जगाला भेडसावणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थानिक धोरणांवर उभयतांत चर्चा झाली. अध्यक्ष बायडेन यांनी सरकारला करायच्या असलेल्या अग्रक्रमांवर चर्चा केली. ट्रम्प निवडून आल्यानंतर बायडेन यांनी सत्तांतर शांततापूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. याचाच पुनरुच्चार त्यांनी ट्रम्प यांच्यासमोर केला.’

हेही वाचा >>> “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची घोषणा; भाजपाकडून सडकून टीका

मॅट गेत्झ अमेरिकेचे नवे अॅटर्नी जनरल

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅट गेत्झ यांची अमेरिकेचे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले, ‘फ्लोरिडाचे खासदार मॅट गेत्झ यांची अमेरिकेचे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्तीची घोषणा करताना मला आनंद होत आहे. मॅट गुन्हेगारी संघटना नेस्तनाबूत करतील आणि न्याय विभागावरील अमेरिकी नागरिकांचा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करतील.’

मार्को रुबिओ अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्को रुबिओ यांची परराष्ट्रमंत्री म्हणून घोषणा केली आहे. अमेरिकी आणि मित्रदेशांसाठी रुबिओ यांची नियुक्ती दिलासा असेल, तर चीन आणि इराणसाठी डोकेदुखी वाढविणारी असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी माइक वॉल्त्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून घोषणा केली. चीन आणि इराणसंबंधी ट्रम्प यांच्या भूमिकांशी या दोघांचीही मते मिळतीजुळती आहेत. अमेरिका-फर्स्ट धोरणाशी सुसंगत त्यांची धोरणे असतील, असे बोलले जात आहे.

बायडेनजिनपिंग पेरू येथे भेटणार

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी पेरू येथे भेटणार आहेत. आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उभयतांत भेट होईल. द्विस्तरावरील संबंधांचा दोन्ही नेते आढावा घेतील.

लोकांच्या इच्छेचा आम्ही आदर करतो. निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. त्यांचा आदर राखला जाईल. अमेरिकी जनतेचा सन्मान होईल, अशाच मार्गाने सत्तांतर होईल. कॅरिन जीन पिरेमाध्यम सचिव, व्हाइट हाउस

Story img Loader