Donal Trump On Indian Election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत, भारतात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांवर मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी यूएसएआयडी अंतर्गत २१ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी त्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, मागील जो बायडेन यांचे प्रशासन भारतात दुसऱ्याला कोणाला तरी निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. ट्रम्प यांना विचारण्यात आले की जो बायडेन यांना मोदी सरकारऐवजी भारतात दुसरे सरकार सत्तेत यावे असे वाटत होते का? यावर, ट्रम्प यांनी बायडेन सरकारने भारतात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर्स देण्यावर आक्षेप व्यक्त केला.

मला वाटते की त्यांना…

याचबरोबर पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, “भारतात मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्याला २१ दशलक्ष डॉलर्स देण्याची गरज का आहे? मला वाटते की त्यांना दुसरे कोणाचेतरी सरकार आणायचे होते. आपल्याला हे भारत सरकारला सांगावे लागले.” ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, यूएसएआयडीच्या पैशांचा वापर करून भारतात दुसऱ्याला जिंकवण्याचे प्रयत्न केले जात होते.

भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप

बायडेन प्रशासनाकडून भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप झाल्याचे संकेत देत ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन सरकार हे प्रकरण उचलून धरणार आहे. त्यांनी सांगितले की, ते मोदी सरकारशी या विषयावर चर्चा करतील. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGE (सरकारी कार्यक्षमता विभाग) ने १६ फेब्रुवारी रोजी उघड केले होते की, त्यांनी भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी USAID अंतर्गत २१ दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली होती. या खुलाशामुळे भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपाला स्वबळावर बहुमत नाही

भारतातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपाला स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता, परंतु मित्रपक्षांच्या मदतीने मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले. भाजपाने एनडीएच्या मित्रपक्षांसह सरकार स्थापन केले. बहुतेक एक्झिट पोलनुसार, लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकेल असा अंदाज होता, परंतु ४ जून २०२४ रोजी जाहीर झालेल्या निकालांमधून देशासमोर चित्र आले.


Story img Loader