Donald Trump Blames Ukraine For War: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, विविध निर्णय आणि घोषणांचा धडाका लावला आहे. त्यामुळे ते जगभरात चर्चेत आहेत. अशात त्यांनी आता युक्रेनला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी युद्ध सुरू केल्याबद्दल युक्रेनला दोषी ठरवले आहे. रशियाच्या आक्रमणानंतर जवळजवळ तीन वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान काही मंगळवारी रियाधमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका-रशिया यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. दरम्यान या चर्चेत युक्रेनला सहभागी करून न घेतल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी निषेध नोंदवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान झेलेन्स्की यांनी नोंदवलेल्या निषेधावर निराशा व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले, “तुम्ही (युक्रेनने) हे युद्ध सुरू करायला नको होते. तुम्ही करार करू शकला असता. मी युक्रेनसाठी करार करू शकलो असतो. त्यामुळे त्यांना जवळजवळ सर्व जमीन मिळाली असती आणि एकही माणूस मारला गेला नसता, एकही शहर उद्ध्वस्त झाले नसते.”

रियाधमधील बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले, “रशिया काहीतरी करू इच्छित आहे. त्यांना युद्ध रोखायची आहे. मला विश्वास आहे की, माझ्याकडे हे युद्ध संपवण्याची ताकद आहे.”

यापूर्वी रियाधमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिका-रशिया चर्चेत सहभागी असलेल्या पक्षांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय पथक स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे.

काल (मंगळवारी) रियाधमध्ये अमेरिका आणि रशियन शिष्टमंडळांची चार तासांहून अधिक काळ बैठक झाली. यावेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह देखील उपस्थित होते.

रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाला होता. रशियाने युक्रेनच्या सीमा ओलांडून सैन्य हालचाली सुरू केल्या आणि त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. यानंतर युक्रेनच्या रक्षणासाठी अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला, तर रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. या युद्धामुळे अनेक नागरिकांची जीवितहानी झाली, आणि लाखो लोक शरणार्थी झाले आहेत.

युद्धाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हवाई हल्ले आणि लष्करी आक्रमण केले. युक्रेनने त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मजबूत प्रतिकार केला आहे. याचबरोबर पश्चिमी देशांनी सैनिकी मदतीसाठी हत्यारं, दारूगोळा आणि आर्थिक सहाय्य दिले आहे. त्याचवेळी, रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था, तेल आणि गॅस उद्योगावरही मोठा परिणाम झाला आहे.