न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे विकास करण्याचे धक्कादायक विधान केल्यामुळे जगभरात गोंधळ उडाला. गाझा पट्टीसह अरब राष्ट्रांमध्ये या वक्तव्यावर तीव्र नाराजी असतानाच अमेरिकेच्या अनेक मित्रराष्ट्रांनीही या घोषणेला विरोध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीनलँड आणि पनामा ताब्यात घेण्याच्या घोषणेनंतर आता ट्रम्प यांनी नवा वाद छेडला असतानाच आता ‘युद्धग्रस्त गाझा पट्टीवर स्वत:चा अंमल बसवून त्या भागाचा आर्थिक विकास करू. त्यामुळे तेथे अमर्यादित रोजगारनिर्मिती होईल,’ अशी थेट घोषणा ट्रम्प यांनी केली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गाझा पट्टीत सध्या राहत असलेल्या सुमारे २० लाख पॅलेस्टिनींनी पश्चिम आशियातील इतर देशांत विस्थापित व्हावे, असा अजब सल्लाही ट्रम्प यांनी दिला. मात्र, गाझा पट्टीत कोणाला राहू देणार, यावर त्यांनी काही भाष्य केले नाही. ट्रम्प म्हणाले की, ‘पॅलेस्टिनींना अन्य कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते गाझा पट्टीत आहेत. गाझा पट्टी आत्ता पूर्ण उद्ध्वस्त आहे. अगदी प्रत्येक इमारत मोडकळीस आली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाखाली पॅलेस्टिनी राहत आहेत. हे अतिशय धोकादायक आहे. याउलट, ते अतिशय सुंदर घरांत सुरक्षित राहू शकतात.

ट्रम्प यांच्या घोषणेवर नेतान्याहू म्हणाले, ‘असे काही झाले, तर मोठा इतिहास घडेल. असे होणे खरेच इष्ट आहे. गाझा पट्टीतून इस्रायलला भविष्यात कधीही धोका नसेल, याची हमी आम्हाला हवी आहे. ट्रम्प यांनी हा विषय अगदी उच्च स्तरावर नेला आहे. दहशतवादाने ग्रस्त भूमीसाठी एक वेगळे भविष्य या निर्णयामुळे असेल. या निर्णयामुळे इतिहास बदलेल.’

‘जगातील लोकांचे निवासस्थान’

गाझा पट्टी ही जगातील लोकांचे निवासस्थान असेल. एक अविश्वसनीय अशी ती जागा असेल. असे काही होण्याची गाझा पट्टीची नक्कीच क्षमता आहे. जगातील सर्व प्रतिनिधी, अगदी पॅलेस्टिनीही तेथे असतील. एक चमत्कार घडविण्याची आपल्याला संधी आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. गाझा पट्टीमध्ये अमेरिकी सैन्य पाठविणार का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेला जे करणे आवश्यक असेल, ते केले जाईल. अमेरिका गाझा पट्टीवर कशा पद्धतीने ताबा मिळवेल, याचा आराखडा समोर ठेवत तेथे दौरा करण्याचीही इच्छा व्यक्त केली.

अमेरिका गाझा पट्टीचा ताबा घेईल. त्यावर नियंत्रण मिळविले जाईल. तेथील धोकादायक जिवंत बॉम्ब आणि इतर शस्त्रे अमेरिका निकामी करेल. उद्ध्वस्त झालेल्या इमारती पाडून जागा साफ केली जाईल. तेथे आर्थिक विकास, अमर्यादित रोजगारनिर्मिती आणि नागरी प्रकल्पांचा विकास करू…

डोनाल्ड ट्रम्पअध्यक्ष, अमेरिका