अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोलोराडो कोर्टाने मोठा झटका दिला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तनुसार पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प सहभागी होऊ शकणार नाहीत, त्यांना कोर्टाने निवडणूक लढवण्याची बंदी या न्यायालयाने घातली आहे. इतकंच नाही तर कोर्टाने राज्याच्या सचिवांना ट्रम्प यांचं नाव रिपब्लिक राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतून वगळलावं असेही आदेश दिले आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये ६ जानेवारी २०२१ या दिवशी जो हल्ला केला त्या प्रकरणात हे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदानासाठी अयोग्य ठरल्याचं कोर्टाने जाहीर केलं आहे. आता ट्रम्प यांच्यापुढे काय पर्याय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमेरिकेच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प हे पहिले असे नेते आहेत ज्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशाप्रकारे अयोग्य ठरवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार विद्रोहात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत केलं जाऊ शकतं किंवा नेत्यांवर निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यानुसार आता कोर्टाने हा निर्णय दिला आहे जो डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा झटका मानला जातो आहे. हा निकाल कोलोराडो न्यायालयाने दिला असला तरीही तो एका राज्यापुरता मर्यादित आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ट्रम्प यांच्याकडे असणार आहे.

कोलोराडो कोर्टात याचिका

कोलोराडो न्यायालयात एका समुहाने २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढण्यापासून रोखावं ही मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेत दावा करण्यात आला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लोकांच्या भावना भडकवून दंगल पेटवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाचा हा निर्णय त्रुटीपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

कोलाराडो येथील न्यायालयाने आज अनेक त्रुटी असलेला निर्णय दिला आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आम्ही याचिका दाखल करणार आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.